आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी : उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित श्री शिवाजी विद्यालय व शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र चिखर्डे अंतर्गत उपकेंद्र कारी यांच्यावतीने गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
कारीत मतदार दिनानिमित्त जनजागृती फेरी
यावेळी विद्यालयाचे सहशिक्षक ए. एम. जोशी म्हणाले की गावातील नागरिकांचे मतदार यादीमध्ये नाव नाही त्यांनी नाव नोंदणी करावी.कोरोना या रोगापासून आपला बचाव करण्यासाठी वारंवार साबणाने हात धुऊन जिवाणू व विषाणूला पळवून लावू. हाती घेतला वसा, ज्येष्ठ नागरिकांनो घरी बसा. आरोग्य कर्मचारी येती घरा यांना सहकार्य करा. असा संदेश या जनजागृती फेरी मधून देण्यात आला.
यामध्ये पोलीस पाटील अमृता माळी, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक भुसारे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जाधवर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या उमरदंड, यांच्यासह अंगणवाडी सेविका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.