fbpx

मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्ष पदी आजम शेख व कार्याध्यक्ष पदी अकबर मुजावर यांची निवड

कुतूहल न्यूज नेटवर्क

सोलापूर दि. 28 : मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्ष पदी आजम शेख व कार्याध्यक्ष पदी अकबर मुजावर यांची निवड करण्यातआली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष फारूकभाई मटके यांच्या हस्ते नवनियुक्त तालुकाध्यक्ष आजम शेख व कार्याध्यक्ष अकबर मुजावर यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सदर आढावा बैठकीस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव ऍड. सलीम नदाफ, जिल्हा उपाध्यक्ष मौलना अब्बास शेख,जिल्हा सरचिटणीस सादिक पठाण,बाबू पटेल, अनिल उकरांडे, इरफान शेख, आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *