कुतूहल न्यूज नेटवर्क
वाढदिवसावर खर्च न करता सासुरेतील बालाजी आवारे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस केली मदत
वैराग : – सासुरे ता बार्शी येथील नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष बालाजी आवारे यांनी वाढदिवसाचा कोणताही खर्च न करता सामाजिक जवाबदारीच्या भावनेतून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत केली आहे.
सध्या कोरोनाची मोठी साथ पसरली आहे.अखिल मानवजातीच्या मुळावर उठलेल्या या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारसह अनेक सेवाभावी संस्था प्रयत्नशील आहेत,अनेक गोरगरीब रस्त्यावर आले आहेत त्यांना मदतीचा हात म्हणून वाढदिवस साजरा न करता पाच हजार रुपयाची मदत धनादेशच्या स्वरूपात केली आहे.