fbpx

भाजपा युवा मोर्चा उस्मानाबाद जिल्हा संयोजक सोशल मीडियापदी बालाजी जाधव

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून युवकांचे संघटन बांधण्याचे काम सुरू आहे. उस्मानाबाद येथील यशराज लॉन्स येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासू असलेले अंबेजवळगे येथील ग्रा. पं. सदस्य बालाजी जाधव यांची भाजपा युवा मोर्चा उस्मानाबाद सोशल मीडिया जिल्हा संयोजक पदी निवड करण्यात आली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर, युवा वॉरियर्सचे प्रदेश संयोजक अनुप मोरे, मराठवाडा संयोजक प्रेरणाताई होनराव, जिल्हा प्रभारी अरुण पाठक, अनिल काळे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, अभय इंगळे आदी उपस्थित होते. जाधव यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *