fbpx

कुबोटा ट्रॅक्टर विक्रीमध्ये बार्शीची जगात सरशी! संतोष ठोंबरेंचा एमडी ट्रॉफीने सन्मान

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: जपानस्थित कुबोटा अॅग्रीकल्चर मशिनरी इंडिया कंपनीचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे कुबोटा ट्रॅक्टरचे वितरक बार्शी येथील के. टी. ट्रॅक्टर्स यांना २०२० या वर्षात ग्राहक सेवा, सेवा समर्थन, ग्राहक समाधान, शाखाविस्तार, सक्षम मनुष्यबळ, विक्रमी ट्रॅक्टर विक्री, बाजारातील कुबोटा टॅक्टरचा मार्केट शेअर आदी मापदंडामध्ये बाजी मारत चार वर्षात सलग दुसऱ्यांदा देशात क्रमांक एक मिळवला आहे. कंपनीच्या वतीने देण्यात येणारी नंबर एकची एमडी ट्रॉफी त्यांना मिळाली आहे. के. टी. ट्रॅक्टर्सच्या वतीने चेअरमन तथा कार्यकारी संचालक संतोष ठोंबरे यांनी हे अॅवार्ड स्विकारले. यामुळे बार्शीचे नाव जागतिक पातळीवर पोहचले आहे.
तालुक्यातील खामगाव येथील रहिवाशी असलेल्या संतोष ठोंबरे यांनी २०१० साली बार्शीतील लातूर रोडवर के. टी. ट्रॅक्टर हे कुबोटा कंपनीचे शोरुम सुरु केले. अल्पावधीतच त्यांनी या व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन करीत ट्रॅक्टर विक्रीमध्ये बाजी मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे सोलापूर व उस्मानाबाद या दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असून दोन्ही जिल्ह्यातील १८ शाखांच्या माध्यमातून ठोंबरे यांनी २०२० मध्ये कोरोना सारखी जागतिक महामारी असताना सुध्दा १००५ ट्रॅक्टरची विक्रमी विक्री केली आहे. तर मागील दहा वर्षात त्यांनी सहा हजारापेक्षा जास्त ट्रॅक्टरची व्रिकी करुन एक नवीन मापदंड तयार केला आहे.
एम. डी. ट्रॉफी देताना कंपनीने ट्रॅक्टर ग्राहकांना दिलेली सेवा, सर्व्हीस सपोर्ट, ग्राहकांचे समाधान, शाखाविस्तार, व सक्षम मनुष्यबळ, बाजारातील कंपनीचा मार्केट शेअर वाढवणे, आदी बाबींचा विचार करुन कंपनीचे संचालक तथा वरिष्ठ उपाध्यक्ष गुरमितसिंग ग्रेवाल व संचालक सिंतारो शेशीमोटो यांच्या हस्ते ऑलराऊंडर (एम.डी) ट्रॉफी देऊन संतोष ठोंबरे यांचा सोमवारी पुण्यातील कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यावेळी रिजनल मॅनेजर आशुतोष देशमुख, ऑल इंडिया मार्केटिंग हेड सागर मडला, महाराष्ट्र राज्य प्रमुख सचिन राजमाने, टेरीटरी मॅनेजर जितेंद्र तांबारे आदी उपस्थित होते. यावेळी क़े. टी. टॅक्टर्सला ‘बी’ सीरीजमधील ट्रॅक्टरच्या सर्वाधिक विक्रीबद्दल ही ट्रॉफी देऊन देखील सन्मान करण्यात आले.
के. टी. ट्रॅक्टर्स देशात नव्हे तर जगात मिळवला प्रथम क्रमांक
देशातील विविध राज्यामध्ये कंपनीचे सुमारे अडीचशेपेक्षा जास्त डिलर आहेत. या डिलरमध्ये के. टी. ट्रॅक्टर्सने ही सर्वाधिक विक्री केली आहे. ठोंबरे यांनी केवळ विक्री वाढवून पैशाचा विचार न करता ग्राहकांच्या समाधानाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. तसेच त्यांनी विक्री वाढवताना कंपनीचा या दोन जिल्ह्यामध्ये मार्केट शेअर देखील वाढवला आहे. त्यांनी केवळ देशामध्ये नव्हे तर संपुर्ण जगामध्ये असलेल्या कुबोटा कंपनीच्या डिलरमध्ये ट्रॅक्टर विक्रीमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. ठोंबरे यांच्यासारखे डिलर आमच्या कंपनीला मिळाले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे कुबोटा ट्रॅक्टर प्रमुख सचिन राजमाने यांनी काढले.
उद्योगासोबत सामाजिक कार्यात ही अग्रेसर
उद्योगामध्ये अग्रेसर असलेल्या संतोष ठोंबरे यांनी सामाजिक कामात देखील आपला सक्रिय सहभाग कायम ठेवला आहे. मातृभूमी प्रतिष्ठान, सहयोग स्थानिक रहिवाशी मंडळ, भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी, बार्शी तालुका क्रिकेट असो, आदी संस्थांचे अध्यक्ष म्हणून देखील ते प्रभावीपणे लोकहिताचे काम करीत आहेत. बार्शी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी व्यवसाय करीत असताना संतोष ठोंबरे यांनी केलेली ही देश व जागतिक पातळीवरील कामगिरी निश्चीतच बार्शीकरांसाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या या कामगीरीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सर्वाच्या सहकार्यामुळेच यश – ठोंबरे
ग्राहकांना दिली जात असलेली घरपोच व तात्काळ सेवा, हजर स्टॉकमध्ये उपलब्ध असलेले स्पेअर पार्ट, अनुभवी व प्रशिक्षीत मॅकेनिक, कर्मचारी वृंद व सर्व मित्रपरिवार यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असून या सर्व यशाचे श्रेय हे ग्राहकांचा के.टी. ट्रॅक्टर्सवर असलेला विश्वास व कर्मचार्यांनीही हे आपलेच शोरुम आहे असे समजून दिलेले योगदान, यामुळे हे यश संपादन करु शकलो.असे के. टी. ट्रॅक्टर्स,चे सीएमडी संतोष ठोंबरे यांनी सांगितले.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *