कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी ही सर्वच क्षेत्रातील गुणवत्तेची खाण असून इथल्या मातीत तयार झालेली माणसे विविध क्षेत्रात सातत्याने विश्वविक्रमी कामगिरी बजावत असल्याचे गौरवोद्गार चंद्रकांत पाटील व सुभाष देशमुख यांनी येथै काढले. ज्येष्ठ संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ.रणजितसिंह देशमुख यांनी सदिच्छा-संवाद भेट दिली.
बार्शी ही गुणवत्तेची खाण; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गौरवोद्गार
यावेळी राजा माने यांच्या प्रकाशनाच्या मार्गावर असलेल्या ” ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” या पुस्तकात ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या त्यांच्याच चित्रांची आकर्षक भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. कुबोटा या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ट्रॅक्टर्स ची सर्वाधिक विक्री करून जगात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोषकाका ठोंबरे यांचा चंद्रकांतदादा व सुभाषबापूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चित्रकार नितीन खिलारे यांच्या चित्रकौशल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी मातृभूमीचे मार्गदर्शक व उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट, मातृभूमीचे संचालक अजित कुंकूलोळ, प्रा. किरण गाढवे, कोरोनावरील “कॉकटेल” या उपचार पद्धतीचा राज्यात पाहिला प्रयोग करणारे डॉ. संजय अंधारे, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेशअण्णा पाटील, बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव किरण देशमुख, तेजस राऊत, उद्योजक मुकु़द सोमाणी, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष अजय पाटील, डॉ. शुभम थळपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अविनाश सोलवट यांनी आभार प्रदर्शनपर भाषणात आरोग्य सुविधा विषयी अपेक्षा व्यक्त केल्या. वर्षा झाडबुके-ठोंबरे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रकांतदादा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माने परिवाराच्यावतीने डॉ. संतोष जोगदंड, विनायक माने, आंतरराष्ट्रीय टेनिसस्टार ऑलिंपिकपटू प्रार्थना ठोंबरे, शिल्पा राऊत, मंदा माने, अमित इंगोले, अक्षय दीक्षित, अमोल सावंत, मल्लिनाथ गाढवे, कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे, डॉ. राहूल सामनगावकर, मुरलीधर चव्हाण, नवनाथ कसपटे, सूर्यकांत वायकर, राजाभाऊ देशमुख, कमलेश मेहता, अरुण पाटील महागावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी भाजपा नेते शहाजी पवार, धैर्यशील मोहिते-पाटील, मोहन डांगरे, श्रीकांत देशमुख, महावीर कदम, अतुल दीक्षित तसेच औरंगाबादचे नामदेव खराडे हे आवर्जून उपस्थित होते.