कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: लायन्स क्लब बार्शी रॉयल व आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र जामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बार्शी तालुका व्यसनमुक्ती ग्राम अभियान स्पर्धेची सुरुवात आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करून करण्यात आली.
बार्शी तालुका व्यसनमुक्ती अभियान स्पर्धेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते शुभारंभ
या उद्घाटन प्रसंगी बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच ,ग्रामसेवक, समाजसेवक उपस्थित होते. ही स्पर्धा दि १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने या व्यसनमुक्ती अभियान स्पर्धेत भाग घ्यावा. विजेत्या प्रथम तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे १५ हजार, १३ हजार व १२ हजार रुपये रोख व मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे असे लायन्स क्लब बार्शी रॉयलचे अध्यक्ष गणेश भंडारी यांनी सांगितले.
आमदार राजेंद्र राऊत यांनी पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतःकडून प्रत्येकी दहा हजार रुपये रोख व आमदार निधीतून दहा लाख, आठ लाख व सात लाख रुपये देण्याचे जाहीर केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले की आपले गाव व्यसनमुक्त होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत व बार्शी तालुका महाराष्ट्रातील पहिला व्यसनमुक्त तालुका बनविण्यासाठी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन्स क्लबचे द्वितीय उपप्रांतपाल लायन भोजराज नाईक-निंबाळकर यांनी बार्शी तालुका व्यसनमुक्त होणार असा विश्वास व्यक्त केला तर बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी सर्व ग्रामसेवकांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आवाहन केले.
लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल लायन जितेंद्र दोशी यांनी आमदार निधीतून एवढी मोठी रक्कम जाहीर केल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांचे आभार मानले. आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे डॉक्टर संदीप तांबारे यांनी कार्यशाळा घेताना बार्शी तालुका व्यसनमुक्त झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब चे झोनल चेअरमन नंदकुमार कल्याणी, लायन्स क्लब बार्शी अध्यक्ष विकास जाधव, सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
लायन्स क्लबचे सचिव मंगेश बागुल यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन राहुल दोशी, व केतकी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्लबचे खजिनदार अमोल गुंडेवार, अमित कांकरिया, नितीन मुथा, सुनील पाटील, संतोष दोशी, अमर काळे, संतोष गुळमिरे, सुमित जैन, नवल बजाज, लखन बाफना, सुमित लोढा, शशिकांत बारबोले, मनीष रुगले, राजुल कांकरिया, सुजाता मुथा, शितल भंडारी, मीना जैन, सीमा काळे, वर्षा चांगभले, तृप्ती दोशी यांनी परिश्रम घेतले.