कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते निरंजन प्रकाश भुमकर यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातील वाटा निश्चित झाला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला सहा विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्ती आल्या आहेत. यामध्ये निरंजन भूमकर यांना संधी देण्यात आली आहे.
बार्शी तालुक्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते निरंजन भुमकर यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड
त्यानिमित्ताने राष्ट्रवादीकडून भूमकर यांना तालुक्यामध्ये बळ देण्यात आले आहे. बार्शी विधानसभेसाठी गेल्या निवडणूकीत निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवलेली होती. सध्या त्यांच्या मातोश्री रेखा भूमकर जिल्हा परीषद सदस्य असून ते स्वतः माजी पंचायत समिती सदस्य व वैरागचे सरपंच राहीले आहेत. आगामी वैराग नगरपंचायतीच्या दृष्टीने ही निवड महत्वाची असून तालुक्यातील राष्ट्रवादीला ताकत मिळाली आहे. निवडीबद्दल तालुकाध्यक्ष राजकुमार पौळ, संगमेश्वर डोळसे, राजाभाऊ खेंदाड, हनुमंत पांढरमिसे, श्रीशैल पाटील, इन्नुस पठाण आदींनी भुमकर यांचा सत्कार केला .