कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: तालुक्यातील आगळगावचा सुपुत्र मनोज पांडुरंग माने याची ९२ किलो वजन गटातील माती गटातून महाराष्ट्र केसरी साठी निवड झाली आहे. त्यांचे वडील पांडुरंग लाला माने यांना ३ एकर कोरडवाहू शेती असून ते दररोज रोजाने दुसऱ्याच्या शेतात नांगरणी साठी जातात परिस्थिती हालाखीची असून देखील मुलगा मोठा पैलवान झाला पाहिजे या उद्देशाने ते मनोजला कोणत्याही परिस्थितीत काहीही कमी पडू देत नाहीत.

पांडुरंग माने यांच्या कुटुंबात पत्नी व दोन मुले असून एक मुलगा पैलवान तर दुसरा मुलगा कुरियर सेवेमध्ये बार्शी शहरात काम करतो. सध्या मनोज शिवराय संकुल कुर्डूवाडी या ठिकाणी आपली प्रॅक्टिस करत असून वस्ताद असलम काझी यांच्या नेतृत्वाखाली तो महाराष्ट्र केसरी लढणार आहे, असे मनोजने सांगितले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount