fbpx

बार्शीच्या हवालदाराचा मुंबईत सन्मान; विकास मानेंना कर्तव्यदक्ष पुरस्कार

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांचे सुरक्षा रक्षक विकास माने यांचा महाराष्ट्र कर्तव्यदक्ष पुरस्काराने गौरव करण्यात आला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी मुंबईतील भांडुप येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. माने यांच्या रूपाने बार्शीचा मुंबईत सन्मान झाला आहे.

सदरच्या पुरस्काराचे वितरण मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण तथा क्रीडा अधिकारी राजेश कंकाळ, बॉडी बिल्डर मिस्टर इंडिया मनिष अडविलकर, महाराष्ट्र खेल पुरस्कार समितीचे आयोजक विशाल जाधव यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. तर, बागडी अध्यक्ष महाराष्ट्र खेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष राज कपूर बागडी, उपाध्यक्ष प्रियंका येडलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातून बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विकास काशिनाथ माने यांना पोलीस खात्यातील कर्तव्यदक्ष पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक सेवा विभागासाठी पवन श्रीश्रीमाळ, स्पोर्ट्स विभाग श्रेशा येडलवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

विकास माने हे बार्शी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी असून सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच संवेदनशीलता जपत मार्गदर्शन व मदत करतात. ते हेलथी अँड स्पोर्टी असून सोशल मीडियावरही बार्शीकरांचे लाडके पोलीस कर्मचारी आहेत. आपल्या कर्तव्यात सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला वचनबद्ध मानून ते सेवा बजावतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *