कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी; ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वेदीक गणित लेव्हल १ स्पर्धेत बार्शीचा पद्मराज दिवटे यांने तृतीय क्रमांक पटकवून बनला चॅम्पियन. एकुण ८० पैकी ७५ प्रश्न फक्त ९ मिनीट ९ सेक॔दात सोडवून तृतीय क्रंमांक पटकवून चॅपीयनशीप मिळवले. त्याच्या या यशाचे भरभरून कौतुक होत आहे. मुलगा घङवताना मुलांची आवड निवड याला खेळकर वातावरणाची जोड देऊन बौद्धिक कौशल्य घडवता येते असे मत पद्मराजच्या आई पद्मजा दिवटे यांनी व्यक्त केले. आधुनीक भारताची वाटचाल होत असताना व स्पर्धेच्या युगात अशा शैक्षणीक व्यासपिठाची गरज आहे याचा लाभ सर्वानी घेतला पाहिजे असे मत वडील घननीळ दिवटे यांनी व्यक्त केले.