कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी येथील सहजीवन संस्थेच्या माध्यमातून अविनाश डोईफोडे आणि बालाजी डोईफोडे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून बारंगूळे प्लॉट बार्शी येथील तब्बल पाऊणशे महिलांना किल्ले रायगडाची सहल घडवून आणली आहे. पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सहलीसाठी जाणाऱ्या बसला झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या.
बार्शीतील पाऊणशे रणरागिनींनी सर केला रायगड; सहजीवन संस्थेचा उपक्रम
यावेळी पोलीस उपनिरीक्षक सारिका गटकुळ, पोलीस हवलदार लक्ष्मण भांगे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. किरण गाढवे, माजी नगरसेविका रिजवना शेख, ॲड. सुहास कंबळे, दीनानाथ काटकर, आनंद काशीद सह पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक शेळके म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात वेगवेगळ्या उपक्रमांनी शिवजयंती साजरी केली जाते मात्र डोईफोडे यांनी महिलांसाठी रायगडाच्या सहलीचे आयोजन करून एक स्तुत्य आणि अनुकरणशील असा उपक्रम हाती घेतला आहे. स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला म्हणजे प्रेरनास्थळ आहे. यावेळी सूत्रसंचालन व आभार बालाजी डोईफोडे यांनी मानले.