fbpx

सावधान ! ऑनलाईन डेटिंग ॲप वापरताय..? मग ही बातमी नक्की वाचा

दयानंद गौडगांव :कुतूहल न्यूज नेटवर्क

निगडी प्रतिनिधी: सध्या जगभरात प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन ॲप धुमाकूळ घालताना दिसत आहेत. याचे वापर जितके फायद्याचे आहे, तितकेच घातकही ठरत आहेत. असाच एक प्रकार वाकड येथे घडला आहे.

ऑनलाईन डेटींग ॲपवरून तरूणीशी मैत्री करणे एका तरूणाला चांगलाच महागात पडला आहे. तरूणाला भेटायला बोलावून कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध पाजून मैत्रिणीने लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत वाकड पोलिसांनी एका तरूणीवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि फिर्यादी आशिषकुमार यांची बंबल या डेटिंग ॲपवरून ओळख झाली. त्यातून दोघेजण दररोज एकमेकांसोबत चॅट करू लागले. दरम्यान, महिलेने तिला कामाची गरज असल्याचे सांगून आशिषकुमार यांना चेन्नई वरून पुण्याला भेटायला बोलावले. दोघांनी पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या सयाजी या आलिशान हॉटेलमध्ये रूम बुक केली. 18 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास महिलेने आशिषकुमार यांना कोल्ड्रिंगमधून गुंगीकारक औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर आशिषकुमार यांच्या अंगावरील 90 हजारांची सोन्याची चेन, 25 हजारांची सोन्याची अंगठी, 20 हजारांचा मोबाईल फोन आणि 15 हजारांची रोख रक्कम असा एकूण एक लाख 50 हजारांचा ऐवज घेऊन डेटिंग ॲपवरील मैत्रीण पळून गेली. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत. यामुळे ऑनलाईन ॲप वापरताना जपून वापरणे फायदेशीर ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *