fbpx

बार्शीत हाॅस्पिटलमध्ये तोडफोड; डाॅक्टरांना मारहाण

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी:
जखमींवर उपचार सुरू असताना लवकर उपचार करा, असे म्हणून शिवीगाळ करत डाॅक्टरांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार बार्शीतील सुविधा हाॅस्पीटलमध्ये घडला आहे. याप्रकरणी लहु गायकवाड यांच्या फिर्यादीवरून संदिप पवार (रा. बार्शी) व त्यांच्या अनोळखी मित्रांवर गुन्हा दाखल झाला आहे.
संदिप पवार हे बार्शीतील सुविधा हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यावर डॉ. विजय खुणे, डॉ. मोनाली, नर्स विशाखा चौधरी, आरती कसबे, अनिकेत उदगिरे, राजकुमार कोगदे, राणी गोरे हे त्यांच्यावर उपचार करत होते. तेंव्हा संदिप पवार यांच्या सोबत आलेला अनोळखी मित्राने डाॅक्टरांना लवकर उपचार करा, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. त्यानंतर संदिप पवार हा देखील सर्वांना शिव्या देत बेडवरून उठला व ठार मारण्याची धमकी देऊ लागला. तेव्हा डॉ. खुणे हे त्यांना असे करु नका म्हणून सांगत असताना त्यांना स्टूल फेकून मारले. ते त्यांच्या पायास लागले. त्यानंतर त्यांनी हातात प्लास्टिक बदली घेवून ती राजकुमार कानडे यांच्या हातावर व पाठीवर मारली व दरवाजाच्या काचेवर ढकलून दिले. त्यामुळे त्यांच्या हातास काच लागून जखम झाली आहे. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *