मोहोळ: मोहोळ तालुक्यातील मनगोळी व भैरववाडी ग्रुप सार्वत्रिक निवडणूक 2021 ही निवडून बिनविरोध होण्यासाठी मान्यवरांनी प्रयत्न केले. या प्रयत्नामुळे भैरववाडीतील प्रभाग एक व प्रभाग दोन बिनविरोध झाले. परंतु मनगोळी गावांत प्रभाग तीनसाठी निवडणूक लागली, दोन जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात होते.
मोहोळ- भैरववाडी / मनगोळी ग्रामपंचायतमध्ये सासू दोन वेळा बिनविरोध निवड तर सून निवडणूकीत विजयी
भैरववाडी मधून सुमल सुब्राव गायकवाड यांना गावाने दोन वेळा बिनविरोध केले. मनगोळी प्रभाग तीनमधून सुमल गायकवाड यांची सून स्वाती अशोक गायकवाड यांनी 42 मातांनी बाजी मारली आहे. भैरववाडी व मनगोळी ग्रामपंचायत मध्ये सासू व सून मिळून गावाचा कारभार पाहणार आहेत.