कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रार्थना बालग्राम व वृद्धाश्रम या निवासी प्रकल्पाच्या उभारणीसाठी माणिक गोपीनाथ भोंगाडे व कल्पना माणिक भोंगाडे या शिक्षक पती पत्नीने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २० हजार रुपये देऊन आर्थिक मदत केली.
प्रार्थना बालग्राम व वृद्धाश्रम प्रकल्पाच्या उभारणीसाठी भोंगाडे दाम्पत्याने केली आर्थिक मदत
भोंगाडे हे शिक्षक दाम्पत्य मूळचे सोलापुरातील. सध्या मुंबईमध्येच ते वास्तवास असतात. कोरोना संसर्ग सुरू होण्या अगोदर ते मुंबई येथून सोलापूरला आपल्या नातवंडाकडे आले होते. त्यानंतर काही दिवसांनी लॉकडाऊन सुरू झाल्याने त्यांना मुंबईला परत जाता आले नाही. दरम्यानच्या काळात माणिक भोंगाडे व कल्पना भोंगाडे यांना प्रार्थना फाऊंडेशनच्या कार्याची माहिती मिळाली त्यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या प्रार्थना बालग्राम व वृद्धाश्रम या निवासी प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्प उभारणीसाठी आर्थिक मदत केली. भोंगाडे दामपत्याने केलेल्या मदतीचं सर्व थरातून कौतुक होत आहे.