दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
मोठी बातमी | मावळ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे खुले करण्याचे आदेश
पिंपरी-चिंचवड : मावळ तालुक्यातील भुशी डॅमसह , लोणावळा,टायगर पाॅईंट व इतर सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्याचे आदेश काल पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे गेल्या काही महिन्यांपासून बंदच होते. अनलाॅक प्रक्रिया सुरू झाल्यापासून मावळातील व्यवसायिकांडून वारंवार पर्यटन स्थळे खुली करण्याची मागणी करण्यात येत होती. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होत चालल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे खुली करण्याचे आदेश जारी केले आहे. यामुळे पर्यटक व व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.