कुतूहल न्यूज नेटवर्क
मोठी बातमी- पुणे महापालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच राहणार ; महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे (दयानंद गौडगांव) : पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग १४ मार्च पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मागील दोन आठवड्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोना संसर्ग रूग्णांची सतत वाढ होत आहे. त्यामुळे २८ मार्च २०२१ पर्यंत पालिका हद्दीतील सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता यामध्ये आणखीन पंधरा दिवसांची वाढ करण्यात आली असून दिनांक १४ मार्च २०२१ पर्यंत शाळा महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.