कुतूहल न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र विधानसभा सभागृहामध्ये तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले. आशिष शेलार, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, संजय कुटे, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, किर्तीकुमार बागडिया, नारायण कुचे या आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
मोठी बातमी! भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपा आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आला.