कुतूहल न्यूज नेटवर्क
कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी ही माहिती दिली.
Big News : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार होते. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आली आहे. ६ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेत राज्य निवडणूक आयोगाने सरकारकडे अहवाल मागितला होता. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका स्थगित केल्या आहेत.