कुतूहल न्यूज नेटवर्क
अरेरे काय ही बेजबाबदारी! बार्शीत मेडिकल बायोवेस्ट रस्त्यावर
बार्शी : बार्शी शहरामध्ये दि. २४ मार्च रोजी परंडा रोड सावंत स्टीलच्या पाठीमागील वैद वस्ती रोड येथे वापरलेल्या सिरिंज, औषध, गोळ्यांचा सडा दुपारी एक ते तीनच्या दरम्यान रस्त्यावर पडलेला दिसून आला. अशा प्रकारे भररस्त्यावर मेडिकल वेस्ट (वैद्यकीय कचरा) टाकून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणारे बेजबाबदार आहेत तरी कोण?संबंधित अधिकारी त्यांच्यावर काय कारवाई करणार किंवा करतील का? याची नागरिकातून चर्चा होत आहे.
बार्शी शहर व बार्शी तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे म्हणून एकीकडे खबरदारीचे उपाय पाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात संबंधित अधिकारी हे पुढाकार घेताना दिसतात. मात्र, ज्यावेळी एखादी धक्कादायक घटना घडते. त्यावेळी, संबंधित अधिकारी जे सर्वसामान्यांना जबाबदारीचे धडे देताना दिसतात. अशावेळी मात्र, त्यांची स्वतःची जबाबदारी कुठे जाते अशी विचारणा नागरिकातून होते आहे.