बार्शी : भारतात कोरोना विषाणूता प्रादुर्भाव होण्याला एक वर्ष झालाय. मागच्या वर्षभरात मी लोकांमध्ये जाऊन कामं करत होतो. काळजीही घेत होतो. मात्र यावेळी मला कोरोनाचा संंसर्ग झाला असून माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी, ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे आपण सुदधा काळजी घ्यावी. विशेष काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.