कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंबई: ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर मुंबईतील भाजपच्या एका आमदारानं थेट पवारांवर टीका केली आहे.
बिघडलेला रिमोट… भाजप आमदाराची थेट शरद पवारांवर टीका
राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. तसेच नैसर्गिक आपत्तीत त्या भागाचा दौरा केल्यावर सर्व यंत्रणा नेत्यासाठी फिरवावी लागते. त्यामुळे कामात अडथळा येतो. म्हणून आपण पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलो नाही, असं पवारांनी सांगितलं. ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. असं आवाहन त्यांनी केलं.
पवार यांच्या या आवाहानाचा संदर्भ देत भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत पवारांना ‘बिघडलेला रिमोट’ अशी उपमा दिली आहे.’आपण करायचं नाही आणि इतरांना करू द्यायचं नाही, असा ठाकरे सरकारचा खाक्या आहे. संकटाच्या काळातही राजकारण सुटत नाही. बिघडलेला रिमोटही याला अपवाद नाही, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. ‘कोकणातील पूरग्रस्त भागांमध्ये भाजपचे नेते पोहोचले, तेव्हा प्रशासनाचा गाडा हलला,’ असा दावाही त्यांनी केला आहे.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount