अक्कलकोट प्रतिनिधी : कोरोना महामारीनंतर तालुक्यात परिस्थिती आणखीन बिकट होत चालली आहे. लोकांकडे रोजगार नाही, अशात महावितरणाने मनमानी कारभार करत लाईट बिल भरण्याची सक्ती करत न भरल्यास कनेक्शन बंद करण्याची धमकी देत आहेत. या विरोधात अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व अक्कलकोट तालुका भाजपा कडून महावितरणाला टाळा ठोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आ.सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, कोरोना कालावधीत व्यवसाय ठप्प पडले असताना, हातातोंडाशी गाठ घालणे अवघड झालेल्या जनतेला संकट काळात वीजबीलासाठी दिलासा न देता कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठवून जनतेबद्दल असंवेदनशीलता दाखवली आहे. या निषेधार्थ भाजपा, अक्कलकोटच्या वतीने महावितरणाच्या विरोधात टाळा ठोको हल्लाबोल अंदोलन करत आहोत.