कुतूहल न्यूज नेटवर्क
धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी बार्शीत भाजपाचे घंटानाद आंदोलन
बार्शी : बार्शी शहर व तालुक्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे मंदीर, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा भाविक भक्तांसाठी सुरू करून दर्शनासाठी खुले करावेत या मागणीकरीता, महाराष्ट्रातील आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने आ. राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शीतील श्री भगवंत मंदिराच्या समोर वारकरी संप्रदायातील भाविक भक्तगण बंधू-भगिंनीसोबत टाळ-मृदुंगाच्या गजरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मदन दराडे, शहराध्यक्ष महावीर कदम, वैराग शहराध्यक्ष शिवाजी सुळे, वारकरी परिषदेचे ह.भ.प.परशुराम डोंबे महाराज, रामलिंग पवार,राधा पवार,कांचन रजपूत,मंगल पाटील, भारत पवार, पं स. सदस्य इंद्रजित चिकने, नगरसेवक सुभाष लोढा, पक्षनेते विजय राऊत,दिपक राऊत, कय्युम पटेल, विजय चव्हाण, मदन गव्हाणे,संदेश काकडे, आण्णासाहेब लोंढे, संतोष बारंगुळे, पाचू उघडे,ॲड. महेश जगताप, नागजी दुधाळ,शरद फुरडे, रितेश वाघमारे, रमाकांत सुर्वे, अमोल चव्हाण, धनु मोरे, रोहीत लाकाळ, दयानंद त्रिंबके, धनंजय जाधव, बाबासाहेब मोरे, नानासाहेब धायगुडे, प्रशांत खराडे, युवराज ढगे, मुकुंद यादव, गणेश पवार आदी उपस्थित होते.