कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: संत निरंकारी मंडळ शाखा बार्शी यांच्या वतीने उपळाई ठोंगे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला.
उपळाई (ठों) येथे ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
दरम्यान, लातूरचे ज्ञानप्रसारक महादेव बिराजदार उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, रक्त हे कुठल्याही कारखान्यात तयार होत नसून ते फक्त मानवी शरीरात तयार होते. यावर्षी सोलापूर झोनमध्ये दोन हजार पेक्षा जास्त रक्तदान करण्यात आले. सद्गुरु चे वचन आहे की ‘खून नालीयोमे नहीं नाडीयोमे बहना चाहिए’.
या कार्यक्रमासाठी समाधान राऊत (माढा, ब्रांच मुखी), दत्तात्रय मोरे (बावी), ग्रामसेवक मुकुंद जगदाळे, तलाठी सुतार, संदीप बोटे (उपसरपंच), विजय बापू ठोंगे, संतोष आप्पा पाटील, आण्णासाहेब लुंगसे, जयवंत कदम, मुख्याध्यापक काळे, सेवादल संचालक किशोर ढोले, सेवादल शिक्षक ऋषिकेश शेळके, सेवादल महिला इंचार्ज संगीता भोसले, भैय्या काळे, रमेश सातपुते उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी राजेंद्र चव्हाण, गणेश उमाप, अशोक पाटील, साथ-संगत यांचे सहकार्य लाभले. आभार विठ्ठल बचुटे (बार्शी ब्रांच मुखी) यांनी व सूत्रसंचालन विक्रम क्षीरसागर यांनी केले.