आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी : उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील ग्रामदैवत खंडोबा यात्रेच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.राज्यात कोरोना महामारी च्या काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागला आहे.या रक्तदान शिबिरात रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला रक्तदात्यांना इंडियन रेड क्रॉस सोसायटी बार्शी संचलित श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी कडून आकर्षक भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कारीत रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान करून नोंदवला सहभाग

यावेळी अनिल चौधरी, अमोल जाधव, सतीश सारंग ,राहुल डोके, विशाल डोके, बालाजी विधाते, आसिफ मुलानी, राहुल पखाले, खंडू हाजगुडे, सचिन करळे, आबा घाडगे, शहा रक्तपेढीचे उमेश देशमाने, विशाल घोळवे ,पांडुरंग मांजरे ,बापू ननवरे, चंदू गायकवाड आदी उपस्थित होते.