कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : मळेगाव ता. बार्शी येथील श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने गेल्या २२ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी ११४ रक्तदात्यांनी सहभाग नोंदीवला या सर्व रक्तदात्यांचे मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी यांनी आभार मानले व रक्तदात्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या.या शिबिराचे उद्धाटन वारकरी संप्रदाय संघटनेचे उपअध्यक्ष वसंत नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मळेगांव येथे रक्तदान शिबीर; ११४ रक्तदात्यांनी नोंदीवला सहभाग
यावेळी श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष अंकुश माळी, प्रा. संजयकुमार माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण वाघ, गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, माजी सरपंच गुणवंत मुंढे, उद्दोजक संतोष निंबाळकर, उपसरपंच धीरज वाघ, माजी सैनिक नागनाथ विटकर, आजीनाथ गाडे, किशोर गुरव, प्रहार संघटनेचे युवक अध्यक्ष शंकर विटकर, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, ग्रा.प.सदस्य दशरथ इंगोले, मंडळाचे आदम बागवान, संतोष गाभने, गिरीश माळी, यशवंत गाडे,रा मभाई शहा रक्तपेढीचे जगताप, सुमंत सुधीर, किरण जाधव, ताज्जोद्दीन सय्यद, अनुराधा डोंगरे, सुप्रिया गडकर.अर्चना झिने, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.संजय माळी यांनी मानले