कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पिंपळवाडी ता बार्शी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 35 दात्याने रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पिंपळवाडीत रक्तदान शिबीर
छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी भगवंत रक्तपेढीचे अमोल नवले, प्राजक्ता क्षीरसागर, प्रीतम जाधव, वैभव गुंड महेश, संभाजी ब्रिगेड शाखाध्यक्ष अमित ओव्हाळ, करण चौधरी, अन्नपूर्णा कबड्डी क्लबच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सरपंच रमेश चौधरी,पोलीस अंमलदार अर्जुन कापसे, आजमोद्दीन मुलाणी, मारुती चौधरी, रणजित दळवी, शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.