कुतूहल न्यूज नेटवर्क
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सिद्धार्थ नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
बार्शी: येथील सिद्धार्थ नगर येथे सिद्धार्थ नगर मित्र मंडळ, लोकराजा मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५१ लोकांनी रक्तदान करून भाग घेतला. यावेळी रक्तदान करवून घेण्यासाठी भगवंत ब्लड बँकेचे अध्यक्ष शशिकांत जगदाळे आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. यासाठी लोकराजा संस्थेचे अध्यक्ष धीरज भोसले, वंचित आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक गजशिव, सिद्धार्थ नगर मंडळाचे अध्यक्ष आकाश गायकवाड, उपाध्यक्ष मनोज ओहोळ, खजिनदार सुमित काकडे, सचिव समाधान शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. कुमार जगताप, तहसीलदार सुनील शेरखाने, लघु पाटबंधारे उपअभियंता मच्छिंद्र सोनवणे, इंडियन बेकरीचे मुझम्मिल पठाण उपस्थित होते. यावेळी पोनि गिरिगोसावी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व समजावून सांगताना विविध पैलूवर मार्गदर्शन केले. देशाची घटना लिहून बाबासाहेबांनी सर्वांना समान हक्क, अधिकार देऊन, वंचित घटकाला प्रवाहात आणल्याचे सांगितले. आज त्यांचेच अनुयायी बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालून नविन क्रांती घडवून आणत आहेत. शासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देऊन शिबिराचे आयोजन करून चांगला संदेश दिल्याचे गिरिगोसावी यांनी सांगितले.
डॉ. कुमार जगताप म्हणाले की, मी मेडिकल क्षेत्रात असूनही माझ्यासाठी बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी असल्याचे सांगितले. माझे बालपण हे आंबेडकरी विचारधारा असलेल्या मित्रांमध्ये गेल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मला लहानपणीच कळाले. आज रक्ताचा तूटवडा निर्माण झाला असताना मोठ्या दिमाखात होणारी बाबासाहेबांची जयंती आज तशी न करता अगदी शांततेत शासनाच्या नियमांचे पालन करत अशी शिबिरे भरवत आहे, हाच बाबासाहेबांच्या विचारांचा विजय असल्याचे डॉ.जगताप यांनी सांगितले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे आनंद काशिद, भीमटायगर संघटनेचे शंकर वाघमारे, दयावान कदम, वंचितचे धनंजय जगदाळे, किशोर ढोले, स्वप्निल भालशंकर, भारत कदम, अमोल शिंदे, बसपाचे प्रसन्नजीत नाईकनवरे, रूपेश बंगाळे, रिपाइंचे सनी गायकवाड, आबा बोकेफोडे, उडानचे जमील खान, आकाश चाबुकस्वार, किरण भालशंकर, जफर शेख, अल्पसंख्यांकचे शकील मुलाणी, साजन शेख, जावेद पठाण आदी उपस्थित होते.