कुतूहल न्यूज नेटवर्क
श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न
बार्शी: बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बार्शी टेक्निकल हायस्कूल व भगवंत ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षाताई ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोविड, डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया व इतर रोगामुळे रक्ताची गरज असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे सामाजिक उपक्रम म्हणून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने या शिबिराचं आयोजन केले होते.या शिबीरात टेक्निकल हायस्कूल चे मुख्याध्यापक व्ही. आर. टकले यांच्यासह शिक्षकांनी रक्तदान केले.
सदर शिबीर यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा व्ही .एस. साबळे, प्रा एस .एस शेख, प्रा एस. एस .खराडे, डॉ पी .एस. गांधी, प्रा के .टी. व्हणहुवे, सुरेश दराडे, डॉ व्ही. पी. लिंगायत, डॉ व्ही .एच. वाघमारे ,डॉ एस .आर. मुळे, डॉ एन. आर. दणाने, ग्रंथपाल ए. ए जेवलीकर, चव्हाण ए .एम, पवार. बी. एम, तिवारी. पी. डी, खुळपे व्ही व्ही, अनिल वाघमारे, राजकुमार शिराळ व भगवंत ब्लड बँकेचे प्रवीण नवले आदींनी परिश्रम घेतले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एस .पाटील, टेक्निकल हायस्कूल चे मुख्याध्यापक व्ही. आर. टकले, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.