कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी तालुक्यातील मळेगावात 77 जणांचे रक्तदान
मळेगाव प्रतिनिधी: बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे श्री शिवाजी तरूण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या काळात राज्यामध्ये रक्ताचा पुरवठा कमी पडत असल्यामुळे अनेक रुग्णांनाच्या नातेवाईक यांना रक्त मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन बाळासाहेब महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या शिबिरात 77 तरुणांनी रक्तदान केले. मागील वर्षीही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाच्यावतीने शंभर बाटल्या रक्त संकलन केले होते. श्री शिवाजी तरूण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब व गरजू व्यक्तींना मागील एक वर्षापासून नर्मदेश्वर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे.
यावेळी सरपंच संजयकुमार माळी, माजी सरपंच गुणवंत मुंढे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माऊली, उपसरपंच धीरज वाघ, मंडळाचे उपाध्यक्ष नितीन पवार, ग्रामसेवक शिवाजीराव गायकवाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख, यशदाचे शिवाजीराव पवार, ग्रा. प. सदस्य समाधान पाडुळे, दशरथ इंगोले, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, कल्याण माळी, संदीप विटकर, यशवंत गाडे,दीपक निंबाळकर ,भारत गाडे ,संजय माळी, सचिन कानडे, रामभाई शहा रक्तपेढीचे कर्मचारी आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.