पांगरी : कुतूहल न्यूज नेटवर्क
संभाजी ब्रिगेड व अन्नपूर्णा कबड्डी क्लब यांच्या वतीने रक्तदान शिबीर
बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.शिबिराची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.पिंपळगाव सारख्या छोट्याश्या गावातून 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून आदर्श निर्माण केला आहे,अशा लहान गावाच्या उपक्रमामुळे इतर गाव प्रेरित होऊन ते सुद्धा असे सामाजिक उपक्रम राबवतील असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी सरपंच गोवर्धन चौधरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलीस पाटील शंकर चौधरी,संभाजी ब्रिगेड शाखाध्यक्ष अमित ओव्हाळ,श्री भगवंत रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे आदीं मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रंजित दळवी,करण चौधरी, अभिषेक ओव्हाळ, जमीर मुलाणी,प्रवीण नवले, विजय तोडकरी,अनंत चौधरी व शरद ओव्हाळ यांनी परिश्रम घेतले.