कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी येथे संत निरंकारी फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न. शिबिराचे उद्घाटन इन्द्रपाल सिंह नागपाल झोनल प्रमुख सोलापूर यांच्या हस्ते झाले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अजित कुंकुलोल, बुडूख, सुमंत हे लाभले. उद्घाटनप्रसंगी इन्द्रपाल सिंह नागपाल म्हणाले, रक्त हे कुठल्याही कारखान्यात तयार होत नसून ते फक्त मानवी शरीरात तयार होते, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. शिबिरात 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी किशोर ढोले, राजेंद्र चव्हाण, विक्रम क्षीरसागर, शशिकांत शिंदे यांनी परिश्रम घेतले व बचुटे यांनी आभार मानले.