fbpx

सामाजिक कार्यकर्ते बाळराजे जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: सामाजिक कार्यकर्ते बाळाराजे जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जामगाव येथील आशापूरक जगदंबा देवस्थानच्या वतीने जिल्हापरिषद शाळेच्या आवरामध्ये, कुर्डुवाडी ब्लड सेंटरच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आशापुरक जगदंबा देवस्थानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी समाजसेवेचा विडा हाती घेतलेले सामाजिक कार्यकर्ते बाळराजे जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी व शिक्षकांच्या वतीने बाळाराजे जाधव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जामगाव येथील सरपंच रामचंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अडसूळ, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष भगवान जाधव, शंकर लटके, पांडुरंग यादव, रोहित गडदे, सागर जाधव, विकास मुकटे, सचिन आवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

(Blood donation camp on the occasion of Balraje Jadhav’s birthday)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *