कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद: आसिफ मुलाणी
भूम तालुक्यातील देवळालीत उद्योजक बालाजी सुरवसे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १२१ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. यावेळी उपसरपंच सागर खराडे, भूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य युवराज तांबे, ग्रा. पं. सदस्य समाधान सातव आदी उपस्थित होते.
भूम तालुक्यातील देवळालीत १२१ जणांचे रक्तदान
यावेळी रक्तदात्यांना भगवंत ब्लड बँकेकडून प्रशस्तीपत्र देण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी भाऊसाहेब गायकवाड, श्रीपत सोनवन ,आप्पा थोरात, नेमिनाथ तांबे, साजिद शेख, अजित कदम, महादेव कदम, लक्ष्मण जाधव, सागर सुरवसे, भूषण टिळक, अशोक गायकवाड, शिवलिंग विभुते, कानिफनाथ पंडित, अशोक कारकर, शुभम बोटे, अमर जगताप, विजय राऊत, बाबासाहेब गिलबिले, अण्णासाहेब गिलबिले आदींनी परिश्रम घेतले.