कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील मळेगांव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब माळी यांच्या मातोश्री रुक्मिणी शंकरराव माळी यांचे दि. २१ मार्च रोजी मळेगावं येथे निधन झाले. त्या समर्थ सद्गुरू बाळकृष्ण माऊलीच्या भक्त होत्या. त्यांची कायम आठवण रहावी म्हणून त्यांच्या अस्थी नदीत विसर्जन न करता स्मशानभूमीत वृक्षारोपण करून अस्थी विसर्जित करण्यात आल.
स्मशानभूमीत अस्थी विसर्जन करत वृक्षारोपण
रुक्मिणी माळी यांना आध्यात्मिक क्षेत्राची आवड असल्यामुळे गावातील भजनी मंडळाने देखील त्यांची आठवण म्हणून एक झाड लावण्यात आले. उंबरे पागे येथील माजी आट्या पाट्या खेळाडू शिवाजी लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील मळेगांव येथे रुक्मिणी माळी यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले.
माळी परिवाराने एक अनोखा उपक्रम राबवत एक पर्यावरण पूरक असा संदेश दिला आहे. रुक्मिणी माळी यांनी गावाला दिलेली शांततेची व एकत्र राहण्याची आठवण कायम गावकऱ्यांच्या आठवणीत राहील. यावेळी बाळासाहेब माळी, सुधीर माळी, गंगुताई माळी, शारदा माळी, निमा माळी, संगीता जठार सह माळी परिवारातील सर्व सदस्य व नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. माळी परिवाराच्या या निर्णयाचे ग्रामस्थांन कडून कौतुक होत आहे.