कोरोनाच्या वाढत्या रूग्णांची चिंता महाराष्ट्र राज्यासमोर मोठे आव्हान आहे. मागील वर्षी मुंबई, पुणे पाठोपाठ सोलापूर जिल्हा हा कोरोना रूग्ण संख्येत अग्रेसर होता. याचं काळात कोरोना रूग्ण उपचार सेवेतही बार्शी तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय सोबत जगदाळे मामा हाॅस्पिटलने आपली भुमिका सक्षम व यशस्वी पणे निभावली होती. जगदाळे मामा हाॅस्पिटलने दिलेली सेवा हि कोरोना महामारी काळातील सेवेची मोठ्या योगदानाची ऐतेहासीक नोंद केलेली आहे . २०२१ कोव्हिङ १९ च्या दुसऱ्या कोरोना लाटेच्या संकटात जगदाळे मामा हाॅस्पिटल धाङसी महिला डॉक्टर, नर्स, मदतनीस यांच्या टिमचे कौतुक फक्त बार्शीतचं नव्हे तर जिल्ह्यासोबत राज्यातही कौतुक चर्चेचा विषय बनला आहे. या पथकात वैद्यकीय टिममधे डॉक्टर गितांजली पाटील तसेच स्टाफ सुलभा अवधूते, ललिता अंबूरे, बिरारे, अफसाना शेख, प्रांजली कदम, मदतनीस लता भट, सारिका कांबळे, शीला नवगिरे अशा रणरागिणी धाडसाने सेवा देत आहेत. अशा सर्व वैद्यकीय टिम रणरागिणीनांचे कौतुक होत आहे. शब्दांकन :- घननीळ दिवटे, संचालक प्रगती फाऊंङेशन बार्शी, मो. 9890513800
आपणही आपले मत/विचार/लेख वाहकांचे मत ह्या सदरातून प्रकाशित करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क मो. 7020502856, ईमेल : kutuhalnews@gmail.com