fbpx

शरद पवार पुन्हा रुग्णालयात, तोंडाचा अल्सर काढला; नवाब मलिक यांचं ट्विट

कुतूहल न्यूज नेटवर्क

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तोंडातील अल्सरही काढून टाकण्यात आला आहे. त्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे रुटीन चेकअप आणि फॉलोअपसाठी पवार ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना तोंडाचा अल्सर असल्याचं आढळून आल्याने हा अल्सर काढून टाकण्यात आला आहे. सध्या शरद पवार हे रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे. तसेच पवार साहेब रोज कोरोना संसर्गाचा आढावा घेत आहेत. ते लवकरच बरे होऊन आपल्या दैनंदिन कार्यास सुरुवात करतील, असंही मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *