कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलात काही महिन्यांपूर्वी रूजू झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन झाले आहे. सकाळी जीममध्ये व्यायाम करीत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. हृदयविकाराचा हा धक्का तीव्र असल्यामुळे त्यांना उपचारासाठी अश्विनी रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
जीममध्ये व्यायाम करत असताना सुरवातीला त्यांना चक्कर आली होती. त्यानंतरही थोडावेळ थांबून त्यांनी पुन्हा व्यायाम सुरूच ठेवला. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने जीम ट्रेनर तसेच तेथे उपस्थित असलेले अधिकारी अंकुश चव्हाण यांनी त्यांच्या हृदयाला पंपिंग केले. त्यानंतर तात्काळ त्यांना अश्विनी सहकारी रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले हे यापुर्वी अमरावती पोलीसात कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची सोलापूर पोलीस आयुक्तालयात नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी शहरातील गुन्हेगारीला चाप लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. कालच त्यांनी मोटार सायकल चोरी करणारे मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount