कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील तांदूळवाडी येथील सुयश विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ८६.९५ टक्के लागला. विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थी मधुसूदन जाधवर याने ३०० पैकी २७६ गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.(Brilliant success in the scholarship examination of Suyash Vidyalaya at Tandulwadi)
तांदुळवाडीतील सुयश विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत देदिप्यमान यश
इयत्ता पाचवीचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत ३१ पात्र तर ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. इयत्ता आठवीचे २० विद्यार्थी पात्र तर १३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. या परीक्षेत इयत्ता पाचवीतील वृषाली खुने, अंजनेय तावसकर, संस्कृती कदम तसेच इयत्ता आठवीतील रोहित गाभणे, विनायक पाटील, भक्ती खटाळ आदी विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
संस्थेचे संस्थापक एस. टी. नलवडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे, मुख्याध्यापक पी.बी. शिर्के यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार केला. या विद्यार्थ्यांना शिक्षक मुठाळ, पवार, मोकाशी, भोसले, शिक्षिका बोराडे, येवले यांचे मार्गदर्शन लाभले.