कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बंद फ्रॅब्रिकेशनचे दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी फ्रॅब्रिकेशनचे साहित्य चोरून नेल्याचा प्रकार मालवंडी ता.बार्शी येथे उघडकीस आला. नागेश होनराव (वय 28वर्षे) रा.मालवंडी ता. बार्शी या व्यवसायीकाने याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुमारे सहा महिन्यापूर्वी फिर्यादीने शेतातील खोलीत सद्गुरु कृपा फब्रिकेशन व्यवसाय चालू केला असून त्याकरिता लागणारे मशिनरी साहित्य बार्शी येथून खरेदी केले होते. दुकानात मधुकर हरिश्चंद्र उकरंडे व सामाधान पंडीत कावरे दोघे रा.मालवंडी ता. बार्शी हे कामगार काम करतात. शनिवार दि. 03 एप्रिल रोजी सायंकाळी सातचे सुमारास फिर्यादी दुकान उघडून त्यात ठेवलेले म्हशीचे खाद्य सुग्रास काढण्यासाठी गेले. सुग्रास काढून दुकान बंद करून पुन्हा घरी गेले. त्यानंतर ते रविवारी दि. 04 एप्रिल रोजी सकाळी सातचे सुमारास पुन्हा म्हशीसाठी सुग्रास काढण्यासाठी गेले असता दुकानाचा एक पत्रा उचकटलेला दिसला. मशिनरी साहित्य दिसून आले नाही म्हणून त्यांनी त्यांच्या शेतातच आजूबाजूला शोध घेतला असता परंतु ते मिळून आले नाही. फिर्यादीने भाऊ गणेश यांना विचारले असता त्यांनी ही साहित्याबाबत काही माहिती नाही असे सांगितले.
मालवंडीत फॅब्रिकेशनचे दुकान फोडून चोरी; बार्शी तालुका पोलीसात गुन्हा दाखल
तेव्हा फिर्यादीची खात्री झाली की फब्रिकेशन व्यवसायाचे मशिनरी साहित्य कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. चोरट्यांनी चार हजार रुपये किंमतीचे वेल्डींग मशिन, सात हजार रुपये किंमतीचे कटर मशिन, तीन हजार रुपये किंमतीचे 100 फूट व्होल्डर केबल, पाच हजार रुपये किंमतीची लोखंडाला होल मारण्याची ड्रील मशिन आदीसह एकूण वीस हजार पाचशे रुपये किंमतीचे साहित्य लंपास केले. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार रियाज शेख हे करत आहेत.