कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : गत काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सद्यस्थितीत कांद्याला जो दर मिळत आहे त्यामध्ये उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. साठवणूक केलेल्या कांद्यामध्ये कांदा खराब होण्याचे व वजन घटण्याचे प्रमाण वाढत आहे. कांदा उत्पादक संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
कांदा खरेदी ३० रूपये करा, कांदा उत्पादकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
त्यातच आता कांद्याचे दर १२-१५ रूपये प्रति किलो इतके खाली आल्याने राज्यभरातील कांदा उत्पादकांमध्ये मोठी संतापाची भावना असून महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या मदतीने संयुक्तरित्या थेट शेतकऱ्यांचा कांदा ३० रुपये प्रति किलो या दराने सरसकट खरेदी करून हा कांदा परराज्यात व परदेशात पाठवावा व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे .मागणीची दखल न घेतल्यास कांदा उत्पादक संघटनेकडून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने शासनाला निवेदना द्वारे दिला आहे. मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर याना देण्यात आले आहे. शैलेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली युवा अध्यक्ष नितीन कापसे, युवा जिल्हाध्यक्ष संदीप चिपडे व शेतकरी श्रीकांत ढेगळे उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount