सोलापुर-वैराग (ता.बार्शी जि. सोलापूर) येथील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात दुदैवी मृत्यू झाला.वेळापूर (ता.माळशिरस,जि. सोलापूर) पासून पाच किलोमीटरवर पिसेवाडी हद्दीततील विजय नगर शेती फार्मजवळ आज शनिवार (दि.१ ) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि कारचा हा अपघात झाला.
भीषण अपघातात वैराग च्या फलफले कुटूंबातील ६ जण ठार
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,वैराग येथील फलफले कुटुंबीय वैराग येथून जेजुरी येथे देव दर्शनासाठी जात होते. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांची होंडा सिटी कार (एमएच-13-सी जी 5599) पिसेवाडी हद्दीत विजयनगर शेती फार्म येथे आली असता, माळशिरसकडून आलेला अशोक लेलँड कंपनीचा सिमेंट मिक्सर ट्रक (एमएच-09-बीसी-2099) यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला
यावेळी कारमधील शिवराज नागेश फलफले (वय38), दीनानाथ नागेश फलफले (वय 34), वनिता शिवराज फलफले (वय 30), उत्कर्ष शिवराज फलफले (वय 9),सह्याद्री बाबासो फलफले (वय 6) हे कारमध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. .यानंतर कारमधील गंभीर जखमी झालेल्या पार्वती महादेव फलफले (वय. 80), पूजा दिनानाथ फलफले (वय. 28) यांना अश्विनी हॉस्पिटल अकलूज येथे उपचारासाठी दाखल केले.यामधील पार्वती महादेव फलफले यांचा उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. ट्रक चालक पसार झाला आहे.या अपघाताचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.