कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथील प्रगतशील बागायतदार सदानंद गरदडे यांच्या मुलाचा राजवर्धन यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. राजवर्धन यांच्या संकल्पनेतून शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. अल्पोपहार देऊन मोठ्या थाटात सुयश विद्यालय तांदुळवाडी येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी शिवदास नलवडे व प्रमुख पाहुणे पांगरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल उपस्थित होते.
वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून राजवर्धन गरदडेचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा
वृक्षारोपण करताना राजवर्धन गरदडे सह उपस्थित मान्यवर
हा कार्यक्रम राजवर्धन गरदडे याच्या मित्र-मैत्रिणी, शिक्षकासोबत साजरा करण्यासाठी सुयश विद्यालय तांदळवाडी या ठिकाणी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून व शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक प्रदीप शिर्के, आगळगाव आऊट पोस्टचे राजेंद्र मंगरुळे, पत्रकार गणेश गोडसे, पत्रकार संजय बोकेफोडे, इरशाद शेख, सागर गरड, सदानंद गरदडे, शितल गरदडे, हनुमंत गरदडे, संदीप यादव, शिक्षक राजू शेख, गणेश मोरे, महेश येडवे, अक्षय मोकाशी, यशवंत शितोळे, योगेश भोसले, सोमनाथ पवार, शिक्षिका उर्मिला गरदडे , सोनाली जाधव, सारिका साखरे, प्रियंका राऊत, श्रद्धा गायकवाड, स्नेहल बोराडे, रेणुका घोडके, रूपाली बोराडे, रेश्मा काटकर, ऐश्वर्या गरदडे, मैनाबाई गरदडे सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन सोनाली जाधव यांनी केले आहे. (Celebrate Rajvardhan Gardade’s birthday by distributing educational materials)