कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील शिराळे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उपसरपंच दत्तात्रय सुरवसे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
शिराळे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
यावेळी सामुहिक रित्या भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी सरपंच निर्मला अंकुशे, ग्रामपंचायत सदस्य भास्कर चौधरी, किसन ओव्हाळ, अश्रूबा गायकवाड, नेताजी चंदनशिव, नाना चौधरी, संगिता चौधरी, पोलीस पाटील रेखा चंदनशिव, माजी सरपंच बालाजी चौधरी, सुनील चौधरी, समाधान पाटील, नामदेव चौधरी, मधुकर चौधरी, संजय चौधरी, नाना पाटील, सुधाकर चौधरी, ग्रामपंचायत कर्मचारी दादा शेख, गजेंद्र चौधरी, ग्रामसेवक मंगेश जगदाळे आदी उपस्थित होते.