fbpx

रूपालीताई चाकणकर यांचा वाढदिवस तृतीयपंथी भगिनींना मिठाई वाटून साजरा

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी:
३१ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यकक्षा सुप्रिया गुंड-पाटील यांनी बार्शी तालुक्यातील खांडवी या गावांमध्ये तृतीयपंथी समाजाच्या भगिनींना बरोबर घेत केक कापून व त्यांना मिठाईचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.

समाजातील दुर्लक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे रूपालीताई यांनी केलेले आहे. त्यांचाच आदर्श पुढे ठेवून मी माझे कार्य करत आली आहे. तृतीयपंथी भगिनींना मान देण्याचं काम रूपालीताई यांनी केले आहे. त्यामुळे माझ्या मनात ही संकल्पना आली की ताईंचा वाढदिवस तृतीयपंथी भगिनींन बरोबर साजरा करावा जेणेकरून या कोरोना काळात त्यांच्या मनात चैतन्य निर्माण होईल अशा भावना ॲड. सुप्रिया गुंड-पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. या कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या महिला सरचिटणीस रेखाताई तुपे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजशेखर गुंड-पाटील, रत्नदीप कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते व खांडवी ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी, सचिन चोरघडे, ज्ञानेश्वर ठाकरे तसेच खांडवी येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *