कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद: आसिफ मुलाणी
बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात शनिवारी (दि. १९) वाचन दिन साजरा करण्यात आला. वाचन दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वाचन दिन प्रेरणा व महत्त्व या कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन ग्रंथालय विभागाकडून करण्यात आले.
श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात वाचन दिन साजरा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस .पाटील हे होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. विशाल लिंगायत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले की वाचन दिनानिमित्त प्रत्येकाने वाचायला हवीत अशा पुस्तकाबद्दल माहिती दिली. ग्रंथपाल अनिल जेवळीकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी डिजिटल ॲप द्वारे आपण वाचनाचा लाभ घेऊ शकतो याबद्दल माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एच. एस. पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. या आँनलाईन कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा. डॉ. पी. एस. गांधी, डॉ. डोईफोडे मँडम, प्रा. वाय .बी.मुळे, डॉ. जे.के.काशिद, अनिल वाघमारे, डी. ए.वाघे, पी. सी. पवार, सुरेश दराडे, प्रविण मस्तूद, विक्रम सुरवसे यांच्यासह सहशिक्षक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.