बार्शी (आसिफ मुलाणी): बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केले होते. प्रास्ताविक के. टी. व्हनहूवे यांनी तर पाहूण्यांचा परिचय डॉ.व्ही.पी लिंगायत यांनी करून दिला. अध्यक्षस्थानी प्रा डॉ. एच. एस. पाटील हे होते.
महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. अनिता वाळके चंद्रपूर यांनी महिला सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग नोंदवला. आभार डॉ. एस .आर. मुळे तर सूत्रसंचालन डॉ. पी .एस .गांधी यांनी केले.