कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: पांगरी येथील राजीव गांधी केंद्रीय आश्रमशाळेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका किरण बगाडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका बगाडे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली व त्यांचे विचार आचरणात आणावे असे सांगितले.
राजीव गांधी केंद्रीय आश्रमशाळेत महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाजी बगाडे, संजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी भाषणे केली. या कार्यक्रमास अधीक्षक वाहिद शेख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
(Celebration of Mahatma Jyotiba Phule Jayanti at Rajiv Gandhi Central Ashram School)